Ad will apear here
Next
सिंहगड रस्ता उड्डाणपूलासाठी भू-तांत्रिक माहिती संकलन

पुणे : सिंहगड रस्ता येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाची पूर्वतयारी म्हणून भूगर्भ तपासणीला नुकतीच सुरुवात करण्यात आली. या तपासणीच्या वेळी या प्रभागातील नगरसेविका मंजुषा नागपुरे उपस्थित होत्या. 

उड्डाणपूल बांधण्यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव काही विशिष्ट चाचण्या व कार्यवाही कराव्या लागतात. हे भू-तांत्रिक माहिती संकलन त्याचाच एक भाग आहे. या तपासणीतून भूभागात दगड आहे का मुरूम किंवा आणखी काही याची माहिती मिळते. त्यामुळे पुढील खोदाई कशी व कोठे करायची आणि त्याचा अंदाजे खर्च ठरवता येतो.

या विषयी माहिती देताना नागपुरे म्हणाल्या, ‘उड्डाणपूल बांधण्यापूर्वी भूतांत्रिक तपासणी होणे गरजेचे आहे, जेणेकरून पुढील कार्यवाही निश्चित करण्यास मदत होईल. आमदार माधुरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार स्थायी समितीतून मी ३० कोटी रुपये मंजूर करून आणले. पर्यायी रस्त्यांचे काम ८० टक्के पूर्ण केले आहे आणि आता उड्डाणपुलाच्या कामाला गती देत आहोत. आमदार मिसाळ यांच्या सूचनेनुसार आम्ही उड्डाणपूल बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक काम हे उच्च प्रतीचे व्हावे यासाठी प्रयत्नशील आहोत आणि म्हणूनच या तपासणीच्या वेळेस मी जातीने उपस्थित राहिले.’

आधीच वाहतुकीची समस्या असलेल्या सिंहगड रस्त्यावर वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांचा अवलंब केल्यामुळे ही समस्या काही अंशी सुटली होती; पण वाढती रहदारी लक्षात घेता वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यासाठी आमदार मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केल्याचे नागपुरे यांनी सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNRCC
Similar Posts
मंजूषा नागपुरेंकडून विश्रांतीनगर रस्त्याची पाहणी पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर येथे नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी त्यांनी तेथील दुभाजक (डिव्हायडर) कट करून चौक मोठा करणे, लाइट व्यवस्था व रस्ता लवकरात लवकर सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या.
‘अर्बन फुटपाथ’मुळे सनसिटी रस्ता परिसर होणार ‘स्मार्ट’ पुणे : येत्या काही दिवसांत सनसिटी रस्ता परिसर अधिक स्मार्ट होण्याच्यादृष्टीने ‘अर्बन फुटपाथ’ (शहरी पदपथ) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे २०१६ पासून शहरात ‘पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व येथील पदपथाला अद्ययावत स्वरूप देण्यात आले
‘सिंहगड रस्त्यावरील विकासकामे मार्गी लागल्याचे समाधान’ पुणे : ‘सिंहगड रस्त्यावरील पायाभूत सुविधा, कलासंस्कृतीचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्वच बाबतींत गेली अनेक वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची फळे आता दिसू लागली असून, ही विकासकामे मार्गी लागल्याचे पाहताना समाधान वाटत आहे,’ अशी भावना आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकारपरिषदेत दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language